13
मंदिरना विनाश
(मत्तय २४:१,२; लूक २१:५-६)
1 मंग येशु मंदिरमातीन निंघीन जातांना त्याना एक शिष्य त्याले बोलना, “गुरजी दखा, कशा ह्या मोठ्या दगडी अनी कशा ह्या माड्या!”
2 येशु त्याले बोलना “तु ह्या मोठ्या माड्या दखस ना? ह्यासमा असा दगडवर दगड ऱ्हावाव नही; जो पडाव नही.”
दुःख अनी तरास
(मत्तय २४:३-१४; लूक २१:७-१९)
3 येशु मंदिरसमोरला जैतुनना डोंगरवर बशेल व्हता तवय पेत्र, याकोब, योहान अनं आंद्रिया यासनी एकांतमा त्याले ईचारं, 4 “ह्या गोष्टी कवय व्हतीन? अनी ह्या गोष्टी पुर्ण व्हवानी येळ वनी म्हणजे काय चिन्ह दिसतीन? हाई आमले सांग.”
5 येशु त्यासले बोलू लागना, “जपीन ऱ्हा, म्हणजे तुमले कोणी फसाडाले नको. 6 बराच लोके मनं नाव लिसन येतीन, ‘मी ख्रिस्त शे!’ अनी त्या बराच जणसले फसाडतीन. 7 जवय तुम्हीन लढायासबद्दल ऐकशात अनी लढायासन्या अफवा ऐकशात तवय घाबरू नका अस होणारच शे, पण तेवढामाच शेवट व्हवाव नही. 8 राष्ट्रसवर राष्ट्र अनी राज्यसवर राज्य ऊठतीन; अनी जागोजागी भूकंप व्हतीन अनी दुष्काळ पडी, हाई तर प्रसुतीना येळले जशा तरास व्हस तसा तरासनी हाई सुरवात शे.
9 ✡ १३:९ मत्तय १०:१७-२०; लूक १२:११,१२“स्वतःले संभाळा; कारण लोके तुमले न्यायालयमा खेचतीन. सभास्थानमा तुमले मारतीन; अनी मनाकरता तुमले राज्यपाल अनी राज्या यासनापुढे उभा करतीन. हाई तुमनाकरता तठे शुभवर्तमान सांगानी संधी राही. 10 शेवट येवाना पहिले पुरा जगमा सुवार्ता प्रसार व्हवाले पाहिजे. 11 जवय त्या तुमले धरीन तुमनाविरुध्द खटला चालाडतीन तवय तुम्हीन काय बोलानं यानी अगोदरच चिंता करू नका; तर त्या येळले जे काही तुमले सुचाडाई जाई तेच बोला; कारण बोलणारा तुम्हीन नही तर पवित्र आत्मा शे. 12 भाऊ भाऊले अनी बाप पोऱ्याले मारा करता धरी दि, पोऱ्या मायबापसवर ऊठतीन अनी त्यासना जिव लेतीन. 13 ✡ १३:१३ मत्तय १०:२२मना नावमुये सर्व लोके तुमना व्देष करतीन पण जो शेवटपावत ईश्वासमा टिकी राही त्यानंच तारण व्हई.”
महासंकटना काळ
(मत्तय २४:१५-२८; लूक २१:२०-२४)
14 “बठं काही उध्वस्त करणारी ‘अमंगळता’ ज्या जागावर तिना काडीनाही संबंध नही तठे तिले उभी दखशात.” वाचनारानी हाई समजी लेवानं! “तवय ज्या यहूदीयामा शेतस त्यासनी डोंगरवर पळी जावानं. 15 ✡ १३:१५ लूक १७:३१जो धाबावर व्हई त्यानी खाल उतरानं नही अनी काहीच लेवाकरता घरमा जावानं नही. 16 जो वावरमा व्हई त्यानी आपला कपडा लेवाकरता मांगे फिरीन येवानं नही. 17 त्या दिनमा ज्यासले दिन राहतीन अनी ज्या लेकरसले पाजणाऱ्या राहतीन त्यासना भयंकर हाल व्हतीन! 18 तरी हाई हिवाळामा व्हवाले नको म्हणीन देवले प्रार्थना करा. 19 ✡ १३:१९ प्रकटीकरण ७:१४कारण जी सृष्टीले देवनी बनाडं तिना सुरवात पाईन आजपावत व्हयनं नही अनी पुढे व्हवाव नही असा त्या संकटना दिन ऱ्हातीन. 20 प्रभु त्या दिन थोडा नही करता; तर एक बी माणुस जिवत नही ऱ्हाता. ज्यासले त्यानी निवडेल शे त्यासनाकरता त्यानी ह्या दिन थोडा करेल शेतस.”
21 “त्या येळले कोणी तुमले म्हणी, ‘दखा, ख्रिस्त आठे शे!’ दखा, तठे शे! तर खरं मानू नका. 22 कारण खोटा ख्रिस्त अनी खोटा संदेष्टा व्हतीन अनी त्या चिन्ह अनी चमत्कार दखाडतीन जमनं तर ज्यासले देवनी निवडेल शे, त्यासले सुध्दा फसाडतीन. 23 म्हणीन तुम्हीन सावध ऱ्हा! मी पहिलेच तुमले सर्व सांगीन ठेयेल शे.
मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येनं
(मत्तय २४:२९-३१; लूक २१:२५-२८)
24 ✡ १३:२४ प्रकटीकरण ६:१२“हाई संकट ई जावानंतर त्या दिनमा सुर्य अंधकारमय व्हई अनी चंद्र प्रकाश देवाव नही. 25 ✡ १३:२५ प्रकटीकरण ६:१३आकाशमाधला तारा पडतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई. 26 ✡ १३:२६ प्रकटीकरण १:७तवय मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसमा येतांना त्या दखतीन. 27 त्या येळले मी देवदूतसले धाडीन पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत चारी दिशातीन देवनी निवडेल लोकसले एकत्र करसु.”
अंजिरनं झाडना दृष्टांत
(मत्तय २४:३२-३५; लूक २१:२९-३३)
28 आते अंजिरनं झाडना दृष्टांत ल्या. त्यानी कवळी फांदी निंघीसन त्याले पानटा फुटू लागणात म्हणजे उन्हाळा जोडे वना हाई तुमले समजस. 29 जवय तुम्हीन ह्या गोष्टी व्हतांना दखशात. तवय समजा मनी येवानी येळ जवळच येल शे. 30 मी तुमले सत्य सांगस की, जोपावत हाई सर्व पुरं व्हत नही तोपावत हाई पिढीना अंत व्हवाव नही. 31 आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई पण मनं वचन पुसावणारच नही.
कोणलेच तो दिन अनी येळ माहीत नही
(मत्तय २४:३६-४४)
32 ✡ १३:३२ मत्तय २४:३६“अजुन त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्गना देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे. 33 सावध ऱ्हा, जागा ऱ्हा, कारण ती येळ कवय ई हाई तुमले माहित नही. 34 ✡ १३:३४ लूक १२:३६-३८हाई त्या माणुसना मायक शे जो बाहेर गाव जातांना त्याना दाससले घरनी जबाबदारी दिसन त्यासले काम नेमी देस अनी व्दारपाळले जागा ऱ्हाय, व्यवस्थित लक्ष दे, अशी आज्ञा करस तसं हाई शे. 35 यामुये जागा ऱ्हा, कारण मालक कवय घर ई, संध्याकायले, मध्य रातले, पहाटले किंवा सकायले म्हणजे सुर्य उगास तवय हाई तुमले माहीत नही. 36 नही तर तो अचानक ई लागी अनी त्यानी तुमले झोपेल दखाले नको. 37 जे मी तुमले सांगस, ते सर्वासले सांगस; जागृत ऱ्हा!”