20
अश्शूर देश मिसर व कूश देश जिंकून घेईल
1 ज्या वर्षी सेनापती तर्तान * तर्तान अश्दोदास आला, म्हणजे जेव्हा अश्शूराचा राजा सर्गोन याने त्यास पाठवले, त्याने अश्दोदाविरूद्ध लढाई करून ते घेतले. 2 त्या वेळेला आमोजाचा मुलगा यशयाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, “जा व तुझ्या कंबरे पासूनचे गोणपाटाचे वस्त्र काढून टाक व तुझ्या पायातील जोडे काढ.” त्याने तसे केले, तो नग्न व अनवाणी चालला.
3 परमेश्वर म्हणाला, “माझा सेवक यशया ज्याप्रमाणे मिसराविषयी आणि कूशाविषयी चिन्ह व शकुन असा तीन वर्षे नग्न व अनवाणी चालला आहे, 4 त्याप्रमाणे मिसऱ्यांना लाज वाटावी म्हणून अश्शूरचा राजा मिसरच्या कैद्यांना व कूशाच्या तडीपार केलेल्या तरुणांना व वृद्धांना, नग्न आणि अनवाणी आणि त्यांचे कुल्ले उघडे करून नेईल.
5 जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.” 6 त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, “खरोखर, हा आमच्या आशेचा स्त्रोत, ज्याच्याकडे साहाय्यासाठी व अश्शूराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ?”