4
अलीफज ईयोबाला धमकावतो
1 अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि तो म्हणाला,
2 “जर कोणी तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू दु:खी होशील का? परंतू बोलण्यापासून स्वत:ला कोण आवरेल?
3 पाहा, तू पुष्कळांना शिकवले आहेस.
तू अशक्त हातांना शक्ती दिली आहेस.
4 तू तुझ्या शब्दांनी खाली पडणाऱ्यांना सावरले आहेस.
तू अशक्त गुडघे बळकट केले आहेस.
5 पण आता संकटे तुझ्यावर आली आहेत, आणि तू खचला आहेस,
ते तुला स्पर्श करतात. आणि तू त्रासात पडतोस.
6 तुझ्या देवभिरूपणाची तुला खात्री नाही काय, तुझी सात्वीकत्ता तुझ्या आशेचे मार्ग नाही काय?
7 मी तुला विंनती करतो, कोणी निष्पाप कधी नाश पावला का?
किंवा चांगल्या लोकांचा कधी नि:पात झाला का? याच्या विषयी तू विचार कर.
8 मी असे पाहीले आहे की जे घोर अन्यायाची नांगरणी करीतात, आणि कष्ट पेरतात ते तशीच कापणी करतात.
9 देवाच्या श्वासाने ते नाश पावतात.
त्याच्या रागाने ते भस्म होतात.
10 सिंहाची गर्जना, सिंहाचा विक्राळ ध्वनी नष्ट होतो,
तरूण सिंहाचे दात उपटले जातात.
11 म्हातारा सिंह शिकार न मिळाल्यामुळे मरण पावतो, सिंहिणीचे छावे सगळीकडे पांगतात
12 आता माझ्याकडे एक गुप्त निरोप आला,
आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.
13 जेव्हा लोक गाढ झोपेत असतात, मी रात्रीच्या दृष्टांताच्या विचारात असतो,
14 मी घाबरलो आणि माझा थरकाप झाला.
माझी सगळी हाडे थरथरा कापू लागली.
15 एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि
माझ्या शरीरावरचे केस उभे राहिले.
16 तो आत्मा निश्चल उभा राहिला, पण त्याचा आकार मला दिसू शकला नाही,
माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता,
तेथे शांतता होती आणि वाणी असे बोलताना मी ऐकली.
17 मर्त्य मनुष्य देवापेक्षा नितीमान असू शकतो काय?
मनुष्य त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?
18 पाहा, जर देव त्याच्या सेवकावर विश्वास ठेवत नाही.
जर त्यास त्याच्या दूतांमध्ये काही दोष आढळतो,
19 तर जे मातीच्या घरात राहतात त्यांच्याविषयी हे किती सत्य आहे,
ज्यांच्या घरांचा पाया धुळीत आहे,
ते पंतगासारखे तितक्या लवकर चिरडले जातात?
20 आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते नाश पावतात, ते कायमचे नष्ट होतात व कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
21 त्यांच्या तंबूच्या दोऱ्या वर खेचल्या जात नाही काय?
ते मरतात, शहाणपणा न मिळवताच मरतात.”