6
ईयोब आपल्या मित्रांना दोष देतो
नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
“अहो, जर तुम्ही फक्त माझ्या यातना तोलल्या,
जर माझ्या शोकाला तराजूत मोजले.
तर ते आता समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे.
यामुळेच काय माझे शब्द व्यर्थ आहे.
त्या सर्वशक्तिमानाचे बाण माझ्यात आहेत.
माझ्या प्राण विषाला पिऊन घेत आहे, देवाने स्वतः त्याची दहशत माझ्या विरुध्द सज्ज केली आहे
वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय? किंवा गव्हाणीत चारा असता बैल भुकेने हबंरतो काय?
ज्याला चव नाही असे मिठाशिवाय खातात काय?
किंवा अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव असते काय?
ज्याला मी स्पर्श करण्यास नाकारले,
ते माझ्यासाठी तिरस्करणीय अन्न झाले.
अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे!
ज्या गोष्टी हव्यात त्या देवाने मला दिल्या असत्या.
जर देवाच्या ईच्छेत आले तर त्याने मला चिरडून टाकावे,
त्याने आपला हात मजवरून काढून घ्यावा आणि या जीवनातून मला मुक्त करावे.
10 तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल,
जरी मी त्रासात असतो तरी मी दुःखात आनंद करीन,
कारण जो पवित्र आहे त्याचे शब्द मी कधीही नाकारले नाही.
11 माझी काय शक्ती आहे की मी वाट पाहण्याचा प्रयत्न करू?
माझा अंत काय, कि मी स्वतःला आवरून धरू?
12 माझी शक्ती पाषाणासारखी आहे काय?
किंवा माझे शरीर पितळेचे बनलेले आहे काय?
13 माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय,
आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय?
14 कमजोर व्यक्तीवर संकट आले,
त्याने सर्वशक्तिमान देवाचे भय धरणे सोडून दिले, तरी सुद्धा त्याच्या मित्राने विश्वासूपण दाखवावा.
15 बंधूनो, तुम्ही माझ्यासाठी वाळवंटी प्रदेशासमान व कधी न वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे आहात.
16 त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात.
17 जेव्हा ते बाहेर फेकले जातात ते नष्ट होतात, जेव्हा उष्णता वाढते ते जागेवरच वितळून जातात.
18 त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात
ते सुकलेल्या प्रदेशात भटकतात आणि नंतर नाश पावतात.
19 तेमाच्या गटाने तेथे तपास केला.
शबाच्या काफिल्याने आशेने त्याचा शोध घेतला.
20 त्याची अपेक्षाभंग झाली कारण त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती,
ते तेथे गेले परंतु ते तेथे फसले.
21 आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही,
तुम्ही माझी भयानक परिस्थिती पाहीली आणि घाबरून गेला आहात.
22 मला काही द्या असे मी म्हणालो का?
किंवा आपल्या संपत्तीतून मला काही बक्षीस द्या?
23 किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा?
किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का?
24 आता तुम्ही मला समज द्या आणि मी शांत होईन.
माझी काय चूक झाली ते मला दाखवा.
25 प्रामाणिक शब्द किती दु:ख देणारे असतात!
परंतु तुमचे वादविवाद, मला कसे धमकावतील?
26 तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का?
निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का?
27 खरोखर, पोरक्या मुलांवर जुगार खेळता,
आणि तुम्ही व्यापाऱ्यासारखे मित्रांबरोबर घासाघीस करता.
28 पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा.
खात्रीने मी तुमच्या तोंडासमोर खोटे बोलणार नाही.
29 मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही.
खरोखर, कडक धोरण सोडून द्या, कारण माझे ध्येय नितीचे आहे.
30 माझा जीभेवर काही वाईट आहे काय?
माझ्या तोंडाला अर्धमाचा फरक समजत नाही काय?”