127
भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते
परमेश्वर जर घर बांधीत नाही,
तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे.
जर परमेश्वर नगर रक्षित नाही,
तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.
तुम्ही पहाटे लवकर उठता,
रात्री उशीराने घरी येता,
किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे
कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
तरुणपणाची मुले हे वीराच्या
हातातील बाणांसारखी आहेत.
ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!
तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता,
ते फजीत होणार नाहीत.