130
परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा
हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
हे प्रभू, माझी वाणी ऐक;
माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान
लक्षपूर्वक लागलेले असोत.
हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर,
हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
पण त्यांनी तुझे भय धरावे,
म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो,
आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा
माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव.
कारण परमेश्वर दयाळू आहे,
आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
तोच इस्राएलास त्यांच्या
सर्व पापांपासून मुक्त करीन.