5
येशु दुष्ट आत्मा लागेल माणुसले बरा करस
(मत्तय ८:२८-३४; लूक ८:२६-३९)
मंग येशु अनी त्याना शिष्य गालील समुद्रना पलिकडला गरसेकरसना प्रदेशमा वनात. येशु नावमातीन उतरना, तवय एक दुष्ट आत्मा लागेल माणुस कब्रस्तान माईन ईसन त्याले भेटना. तो कब्रस्तानमाच राहे अनं साखळ्याघाई बांधीनसुध्दा तो कोनाचघाई आवराये नही; कारण त्याले बराचदाव बेड्यासघाई अनी साखळ्याघाई बांध तरी तो साखळ्या तोडी टाके अनं बेड्यासना चुराडा करे, त्याले आवरानी ताकद कोनामाच नव्हती. तो रातदिन कब्रस्तानमा अनं डोंगरंसमा वरडत फिरे, स्वतःले दगडसघाई ठेचीले.
जवय त्यानी येशुले दुरतीन दखं, तवय तो पयत ईसन त्याना समोर पाया पडीन; अनी जोरमा वरडीन बोलना, “हे येशु, परमप्रधान देवना पोऱ्या! तुले मनाकडतीन काय तरास शे? मी तुले देवनी शपथ घालस, तू माले शिक्षा देऊ नको!” कारण येशु त्याले बोलना व्हता, “हे दुष्ट आत्मा, ह्या माणुस माईन निंघी जाय!”
येशुनी त्याले ईचारं, “तुनं नाव काय शे?” तो बोलना, “मनं नाव ‘सैन्य’ शे, कारण आम्हीन बराच शेतस!” 10 अनी आमले ह्या प्रदेशमाईन काढु नको; अशा ईनंत्या दुष्ट आत्मासनी येशुले कऱ्यात.
11 तठेच डोंगरजोडे डूकरंसना मोठा कळप चरी राहींता. 12 दुष्ट आत्मासनी त्याले ईनंती करी की, “आमले त्या डुकरंसमा घुसू दे.” 13 त्यानी त्यासले परवानगी दिधी. मंग त्या दुष्ट आत्मा त्या माणुस मातीन निंघीसन डुकरंसमा घुसनात अनी त्या जवळपास दोन हजार डुकरे व्हतात. त्या पयत जाईसन कडावरतीन समुद्रमा पडीसन मरनात.
14 मंग डुकरं चारनारासनी पयत जाईसन हाई बातमी गावमा अनं वावरंसमा लोकसले सांगी. तवय काय व्हयनं हाई दखाकरता लोके तठे वनात. 15 तवय त्या येशु जोडे वनात, अनी त्यासनी ज्यानामा दुष्ट आत्मा व्हतात म्हणजेच सैन्य व्हतं. त्याले शुध्दीवर येल अनं कपडा घालेल दखं, तवय त्यासले भिती वाटनी. 16 ज्यासनी डोयासघाई दुष्ट आत्मा लागेल माणुसनी अनी डुकरंसनी हकीकत दखेल व्हती ती त्यासले सांगी.
17 तवय त्या ईनंती करीसन येशुले सांगु लागनात, तुम्हीन आमना प्रदेशमातीन निंघी जा.
18 मंग तो नावमा बसताच, बरा व्हयेल माणुस त्याले ईनंती करीसन बोलना, “मालेपण तुमनासंगे लयी चला!”
19 पण त्यानी त्याले येऊ दिधं नही. तर त्याले सांगं, तु घर जाय, आपला लोकसले सांगं, तुनावर दया करीसन प्रभुने तुनाकरता कितलं मोठं कार्य करेल शे.
20 मंग दुष्ट आत्मा लागेल माणुसनी घडेल सर्व कार्य येशुनी जे त्यानाकरता करेल व्हतं, ते तो सर्व दकापलीस म्हणजे दहा गावसना शहरमा जाईसन सांगाले लागना, तवय सर्व लोकसले आश्चर्य वाटनं.
मरेल पोर अनी रक्तस्रावी बाई
(मत्तय ९:१८-२६; लूक ८:४०-५६)
21 मंग येशु नावमा बशीसन परत पलीकडला काठवर गया. तठे त्यानाजोडे लोकसनी मोठी गर्दी जमनी तवय तो समुद्रजोडेच व्हता. 22 याईर नावना एक सभास्थानना अधिकारी तठे वना अनं येशुले दखीसन त्याना पाया पडना. 23 तवय तो येशुले कळकळ करीसन ईनंती करू लागना की, “मनी धाकली पोर मराले टेकेल शे. ती वाचाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन ईसन तिना डोकावर हात ठेवा!”
24 मंग येशु त्यानासंगे जावाले निंघना तवय लोकसनी मोठी गर्दी बी त्याना मांगे निंघनी. अनी त्यासनी त्याना आजुबाजू गर्दी करी.
25 ती गर्दीमा एक बाई व्हती तिले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता, 26 तिनाजोडे व्हतं नव्हतं तितलं सगळंच खर्चाई जायल व्हतं. तिले बराच तरास व्हता म्हणीन तिनी वैद्यसकडतीन ईलाज करा तरी फरक पडना नही, उलटा आजार जास्तीज वाढी जायेल व्हता. 27 ती येशु बद्दलन्या गोष्टी ऐकीसन त्या गर्दीमा घुसनी अनी त्यानाकडे ईसन त्याना कपडासले हात लाया, 28 कारण ती सांगे, “मी याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसु.”
29 तवय लगेच तिना रक्तस्राव बंद व्हई गया अनं तिना शरिरले जानवणं मी या आजारपाईन मुक्त व्हई जायल शे. 30 तवय येशुनी हाई लगेच वळखं की, आपलामातीन शक्ती निंघनी, तवय त्यानी मांगे वळीन गर्दीमा ईचारं, “मना कपडासले कोणी हात लाया?”
31 पण त्याना शिष्य त्याले बोलनात, “लोकसनी गर्दी आपला आजुबाजूले शे हाई तुम्हीन दखी राहीनात; तरी माले कोणी हात लाया, हाई कसं काय ईचारी राहीनात?”
32 तरी बी हाई कोणी करं, हाई दखाकरता येशुनी चारीबाजुले नजर फिराई. 33 तवय ती बाई तिनासंगे जे काही घडेल व्हतं. तिनी ते वळखं अनी घाबरीसन अनं थरथर कापत त्यानापुढे वनी अनी गुडघा टेकिन त्यानापुढे पडीसन तिनी त्याले घडेल सर्वकाही खरंखरं सांगं. 34 येशु तिले बोलना, “बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे. सुखरूप जाय, तुना आजारपाईन तु मुक्त शे.”
35 येशु हाई बोली राहींता ईतलामा तठे सभास्थानना अधिकारीना घरतीन काही लोकसनी ईसन अधिकारीले सांगं की, “तुमनी पोर मरी गई. आत्ते गुरजीले कशाले तरास देतस.”
36 तवय येशुनी त्यासनं बोलनं ऐकं, पण त्यासनाकडे ध्यान नही देता तो सभास्थानना अधिकारीले बोलना, “घाबरू नको, ईश्वास ठेव.” 37 तवय त्यानी पेत्र, याकोब, अनं याकोबना भाऊ योहान यासना शिवाय त्यानी आपलासंगे कोणलेच येऊ दिधं नही. 38 अनी त्या अधिकारीना घरना जोडे येताच येशुनी हंबरडा फोडीन रडणारासना अनं शोक करणारसना गोंधळ व्हयेल दखा. 39 तो मजार जाईसन त्यासले बोलना, “तुम्हीन कसाले रडतस अनी गोंधळ करतस? पोर मरेल नही, झोपेल शे!”
40 तवय त्यासनी त्यानी थट्टा करी, पण त्यानी त्या सर्वासले बाहेर काढी दिधं अनी पोरना माय बापले अनी आपला तिन शिष्यसले लिसन पोर व्हती त्या खोलीमा गया. 41 मंग त्या पोरना हात धरीसन तो बोलना, “तलिथा कुम” याना अर्थ, “पोरी, मी तुले सांगस ऊठ!”
42 ती बारा वरीसनी पोर लगेच ऊठीसन चालाले लागनी त्या हाई दखीसन चमकाईनात. 43 हाई बात कोणलेच सांगु नका अस येशुनी त्यासले बजाईन सांगं, अनी “हिले काहीतरी खावाले द्या” अस तो त्यासले बोलना.