मार्क. 14. मंग दोन दिन नंतर वल्हांडण अनी बेखमीर भाकरीसना सण व्हता. तवय येशुले गुपचुप कसं मारी टाकानं हाई मुख्य याजक अनी शास्त्री दखी राहींतात. “पण हाई सणना येळले करानं नही, करं तर कदाचित लोकसमा दंगा व्हई जाई” अस त्या बोलनात. येशु बेथानी गावले जो पहिले कोडरोगी व्हता त्या शिमोनना घर जेवाले बशेल व्हता तवय एक बाई जटामांसी वनस्पतीनं महागडं सुगंधी तेल संगमरवरना भांडामा लई वनी. तिनी ते भांडं फोडीन तेल त्याना डोकावर वती दिधं. तवय काहीजण कुरकुर करीसन बोलणात, “हाई सुगंधी तेलना नाश का बरं करा? कारण हाई सुगंधी तेल एक वरीसनी मजुरी म्हणजे तिनशे चांदिना शिक्कासनावर ईकाई जातं, ते ईकीन त्या पैसा गरीबसमा वाटाई जातात!” अस त्यासनी तिले दताडं. पण येशु बोलना, “जाऊ द्या! तिले का बरं बोली राहीनात? तिनी मनाकरता एक चांगलं काम करेल शे. गोरगरीब कायमना तुमना जोडेच शेतस अनी तुमले वाटी तवय त्यासनं भलं करता ई. पण मी कायम तुमनासंगे राहसु अस नही. तिनाघाई जे करता ई ते तिनी करं; मना मरानंतरनी तयारी पहिलेच तिनी करी दिधी. मी तुमले सत्य सांगस की, सर्व जगमा जठे जठे सुवार्ता सांगतीन, तठे तठे तिनी जे सत्कर्म करेल शे त्यानी आठवण करतीन.” मंग बारा शिष्यसमधला एक यहूदा इस्कर्योतनी मुख्य याजकसकडे जाईन येशुले सोपी दिसु, अस सांगं. त्यानं ऐकीसन त्यासले आनंद व्हयना अनी त्यासनी त्याले पैसा देवानं ठरायं. मंग यहूदा येशुले कसं सोपी देवानं यानी संधी दखु लागना. बेखमीर भाकरना सणना पहिला दिन जवय वल्हांडणना यज्ञकरता कोकरूना बळी देतस, त्या दिन त्याना शिष्य येशुले बोलणात, “आम्हीन कोठे जाईसन वल्हांडणना जेवणनी तयारी करानी अशी तुमनी ईच्छा शे?” मंग येशुनी त्याना शिष्यसमाधला दोन जणसले धाडीन सांगं, “नगरमा जा म्हणजे एक माणुस पाणीनं मडकं लई जातांना तुमले भेटी त्यानामांगे जा. तो ज्या घरमा जाई, तठला घरमालकले सांगा; ‘गुरु सांगस, मी मना शिष्यससंगे वल्हांडणनं जेवण करसु तर पाहुणचार करानी खोली कोठे शे?’ मंग तो स्वतः सजाडेल अनी तयार करेल एक मोठी माडीवरली खोली तुमले दखाडी, तठे आपलाकरता तयारी करा.” मंग त्याना शिष्य शहरमा गयात तवय त्यानी सांगेलप्रमाणेच त्यासले दखायनं अनी त्यासनी वल्हांडणना जेवणनी तयारी करी. मंग संध्याकाय व्हयनी तवय येशु बारा शिष्यससंगे तठे वना. अनी त्या बशीन जेवण करी राहींतात तवय येशु बोलना, “मी तुमले सत्य सांगस की, तुमना मातीन एक माले शत्रुसना हातमा सोपी दि, तो आत्ते मनासंगे जेवण करी राहीना.” त्या नाराज व्हयनात अनी एक एकजण त्याले ईचारु लागणात, “मी शे का तो?” येशुनी उत्तर दिधं, “बारा जणसपैकी एक जो मना ताटमा हात घाली राहीना. मनुष्यना पोऱ्याबद्दल लिखेल शे तसं त्याले जानच शे; पण जो मनुष्यना पोऱ्याले धरीन सोपी देवाव शे त्याना धिक्कार असो! तो माणुस जन्मले नही येता तर ते त्याले चांगलं व्हतं!” त्या जेवण करतांना येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, हाई ल्या, “हाई मनं शरीर शे.” मंग त्यानी प्याला लिधा अनं देवना आभार मानीन त्यासले दिधा, अनी त्यासनी ते पिधं. त्यानी त्यासले सांगं, “हाई मनं रंगत देव अनी मनुष्यना करारले दखाडस, हाई बराच जणसकरता वताई जाई ऱ्हायनं. मी तुमले सत्य सांगस की, मी तोपावत द्राक्षवेलना रस कधीच पिवाऊ नही जोपावत देवना राज्यमा नवा द्राक्षरस पितस नही.” मंग देवनं गानं म्हणीसन त्या जैतुनना डोंगरकडे निंघी गयात. मंग येशु त्यासले बोलना, “तुम्हीन सर्व माले सोडीन पळी जाशात, कारण शास्त्र अस सांगस की, ‘देव मेंढपायले मारी टाकी अनी मेंढरसनी दाणादाण व्हई जाई.’ तरी मी जिवत व्हवानंतर तुमना पहिले गालीलमा जासु.” पेत्र त्याले बोलना, “जरी सर्व तुले सोडीन पळतीन पण मी तुले सोडीन पळाव नही.” येशु त्याले बोलना मी तुले सत्य सांगस, “आज रातले कोंबडा दोनदाव कोकावाना पहिले तु तिनदाव माले नाकारशी.” तरी पेत्र खंबीर व्हईसन बोलना, “तुमनासंगे माले मरणं पडनं तरी मी तुमले नाकारावुच नही!” अनी बाकीना शिष्यसनी पण तसच सांगं. मंग त्या गेथशेमाने नावना बागमा वनात तवय येशु त्याना शिष्यसले बोलना, “मी प्रार्थना करीसन येस तोपावत आठे बठा.” त्यानी पेत्र, याकोब अनं योहान यासले संगे लिधं अनी तो अस्वस्थ अनं व्याकुळ व्हवु लागना, तो त्यासले बोलना, “मी भलता उदास शे, आठपावत की मी मराले टेकेल शे, तुम्हीन आठेच थांबा अनी जागा ऱ्हा.” मंग तो त्यासनापाईन थोडा पुढे गया अनी जमीनवर पडीन प्रार्थना कराले लागना की, “शक्य व्हई तर हाई येळ टळी जावो.” अनी तो बोलना, “हे बापा, हे पिता! तुले सर्वकाही शक्य शे, हाऊ दुःखना प्याला मनापाईन दुर कर. तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुना ईच्छाप्रमाणे व्हवु दे.” मंग त्यानी परत ईसन तिन्ही शिष्यसले झोपेल दखं. तवय तो पेत्रले बोलना, “शिमोन, तु झोपी गया का? एक तास बी तुनाघाई जागं ऱ्हावायनं नही का?” “तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा, अनी प्रार्थना करा. आत्मा कितला बी उतावळा व्हई, पण शरीर अशक्त शे.” येशुनी परत जाईन त्याच शब्दसमा प्रार्थना करी. मंग परत ईसन त्यानी दखं तर त्या झोपेल व्हतात; त्यासना डोया जड व्हई जायेल व्हतात अनी त्याले काय उत्तर देवानं त्यासले समजनं नही. परत तिसरांदाव त्यानी ईसन त्यासले सांगं, “आतेपावत तुम्हीन झोपीन आराम करी राहीनात? पुरं व्हयनं! येळ ई जायेल शे! दखा, मनुष्यना पोऱ्या पापी लोकसना ताबामा सोपाई राहीना. ऊठा, आपण जाऊ. दखा, माले सोपी देणारा जोडे येल शे!” येशु बोली राहींता इतलामा बारा शिष्यसपैकी एक म्हणजे यहूदा तठे वना, त्यानाबरोबर मुख्य याजक, शास्त्री अनी वडील लोकसना माणसे तलवारी अनी टिपरा लई वनात. त्याले सोपणारानी एक इशारा देयल व्हता तो असा की, “मी ज्यानं चुंबन लिसु तोच येशु शे. त्याले धरीन बांधीन अनं संभायीन लई जा.” तो येताच येशुकडे गया अनी “गुरजी!” अस म्हणीन त्याना चुंबन लिधात. मंग त्यासनी त्याले पकडीन बांधं. ज्या येशुजोडे उभा व्हतात त्यासनामाईन एकनी तलवारघाई प्रमुख याजकना सेवकना कान कापी टाका. तवय येशु त्यासले बोलना, “जसं एखादा नियम तोडणाराले धराकरता तलवार अनी टिपरा लई जातस तसा तुम्हीन माले धराले येल शेतस का? मी तुमनासंगे रोज मंदिरमा शिकाडी राहींतु, तवय तुम्हीन का बरं माले धरं नही, पण हाई ह्यानाकरता व्हयनं की शास्त्रना लेख पुरा व्हवाले पाहिजे.” मंग येशुसंगेना सर्व शिष्य त्याले सोडीन पळी गयात. त्या येळले एक तरूण पोऱ्या त्याना आंगवर लुंगीशिवाय काहीच नव्हतं तो येशुना मांगे चाली राहींता, त्याले त्यासनी धराना प्रयत्न करा. पण तो ती लुंगी टाकीन उघडाच पळी गया. मंग येशुले त्या प्रमुख याजकसकडे लई वनात अनी त्यानाजवळ सर्व मुख्य याजक, वडील अनी शास्त्री जमनात. पेत्र दुरतीन त्याना मांगेमांगे चालत मुख्य याजकना वाडामा गया अनी तो पहारेकरीससंगे शेकोटी जोडे शेकी राहींता. मुख्य याजक अनी सर्व यहूदीसना न्यायसभा मधलासनी येशुले मृत्युदंड भेटाकरता त्यानाविरुध्द काय आरोप कराना हाई शोधी राहींतात. पण त्यासले एक बी आरोप सापडना नही. बराच जणसनी त्यानाविरुध्द खोटी साक्ष दिधी, पण त्यासना साक्षमा काहीच तथ्य नव्हतं. काही लोकसनी उभं राहीन येशुनाविरुध्द अशी खोटी साक्ष दिधी की, हाई हातघाई बांधेल मंदिर मी तोडी टाकसु अनी हात नही लावता दुसरं तीन दिनमा उभं करसु अस आम्हीन याले बोलतांना ऐकं. पण त्यासनी हाई साक्षमापण तथ्य नव्हतं. तवय मुख्य याजकनी मझार उभं राहीसन येशुले ईचारं, “ह्या तुनाविरुध्द साक्ष दि राहिनात त्यानावर तुले काहीच उत्तर देणं नही शे का?” येशु गप्पच राहिना, त्यानी काहीच उत्तर दिधं नही. प्रमुख याजकसनी परत त्याले ईचारं, “धन्यवादित देवना पोऱ्या ख्रिस्त तो तुच शे का?” येशुनी सांगं, “मीच शे, अनी तुम्हीन मनुष्यना पोऱ्याले सर्वसमर्थ परमेश्वरना उजवीकडे बशेल अनी आकाशमधला ढगससंगे येतांना दखशात.” मुख्य याजक आपला कपडा फाडीन बोलना, आमले आत्ते साक्षीदारसनी काय गरज! हाऊ देवनी थट्टा करी राहीना, हाई तुम्हीन ऐकं, तुमले काय वाटस? तवय सर्वासनी ठराय हाऊ मरणदंडले योग्य शे. मंग बराच जण येशुवर थुंकू लागणात, त्यानं तोंड झाकीन त्याले बुक्क्या माऱ्यात अनी त्याले सांगु लागणात, “वळख, तुले कोणी मारं!” अनी पहारेकरीसनी त्याले थापड्या मारीन ताबामा लिधं. पेत्र खाल वाडामा व्हता तवय प्रमुख याजकसना सेवकसमाधली एक बाई तठे वनी. अनी तिनी पेत्रले शेकतांना टक लाईन दखीन सांगं, “तु पण येशु नासरेथकरना संगे व्हता ना.” पण त्यानी नाकारीन सांगं, “तु काय सांगी राहीनी, माले माहीत नही अनं समजी बी नही राहीनं” अनी तो वाडाना दुसरी बाजुले गया ईतलामा कोंबडा कोकायना. मंग त्या दासीनी त्याले परत दखं अनी त्यानाजोडे ज्या उभा व्हतात त्यासले सांगु लागणी, “हाऊ त्यासनापैकीच एक शे!” पण त्यानी परत नकार. मंग थोडा येळमा जोडे उभा राहनारासनी पेत्रले सांगं, “तु खरच त्यासनापैकीच शे ना, कारण तु गालीली शे.” मंग पेत्र बोलणा, “जर मी खोटं बोली ऱ्हायनु तर, देव माले मारी टाको! असा शपथा वाहीन बोलु लागणा, हाऊ ज्या माणुसबद्दल तुम्हीन बोली राहिनात त्याले मी वळखत नही!” अनी लगेच दुसरींदाव कोंबडा कोकायना. तवय “कोंबडा दोनदाव कोकाई, त्याना पहिले तु माले तीनदाव नाकारशी” असा ज्या शब्द येशुनी पेत्रले सांगेल व्हतात त्या त्याले आठवणात अनी तो रडाले लागना.