ईयो. 36. अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला, “तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे. मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन. खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत, कोणीतरी ज्ञानाने समजूतदार असा तुम्हाबरोबर आहे. देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे. तो दुष्टांना वाचवीत नाही, तर तो त्याऐवजी जे दुःखात आहेत त्यांच्यासाठी चांगले ते करतो. जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो. जर, साखळदंडानी ठेवले, जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल. तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो, तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो. जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील, तर ते त्यांचे दिवस सुखाने घालतील. परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, त्यांना ज्ञान न होता मरण येईल. जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात. ते अगदी तरुणपणी मरतील, त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल. परंतु देव दु:खी लोकांस त्यांच्या दु:खातून सोडवील विपत्तीच्या द्वारे कानउघडणी करतो. खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते व अडचण नसलेल्या मोकळ्या जागी नेतो, आणि तुझ्या जेवणाच्या टेबलावर भरपूर पौष्टीक अन्न ठेवले असते. परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, दोषारोप व न्याय तुलाच धरतात. तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. लाच तुला न पकडो आणि न्यायापासून दूर घेवून जावो. आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस किंवा तुझ्या सर्व सामर्थ्याचा तुला काही उपयोग होईल काय? दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात. काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दूर रहा. पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे. त्याच्या समान कोण शिक्षक आहे? त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील? ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कोणी त्यास म्हणू शकत नाही. त्याने जे काही केले त्याबद्दल लोकांनी त्याच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत. त्याने कार्य केले ते प्रत्येक मनुष्याला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांसही देवाचे महान कार्य दिसतात. होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे. तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो. अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो. खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो? बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यामध्ये येतो. तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो. तो आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्यास हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो. मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.”